इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलूचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहे. एका सरकारी रुग्णालयात हा स्फोट झाला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

गोळीबारानंतर बॉम्बस्फोट झाल्याचं कळतं. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. बॉम्बस्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शिवाय हा हल्ल्याची जबाबदारी अजून कोणीही स्वीकारलेली नाही.

 

बॉम्बस्फोटाच्या काही तास आधी बलूचिस्तान बार असोसिएशनचे अध्यक्ष बिलाल अनवर कासी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह घेऊन काही वकील सरकारी रुग्णालयात आले होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. त्यामुळे मृतांमध्ये वकिलांची संख्या सर्वाधिक आहे.