कराची(पाकिस्तान): नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले म्हणून पाकिस्तानमधील कराची महापालिकेने कुत्रे नष्ट करण्यासाठी अजबच फंडा वापरला. कुत्र्यांना मांसाद्वारे विष देऊन जवळपास 700 पेक्षा जास्त कुत्रे मारले असल्याचं समोर आलं आहे. कराचीमधील रस्त्यांवर मेलेल्या कुत्र्यांचा खच पडला आहे.
नागरिकांना शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आठवडाभर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्यामध्ये 700 पेक्षा जास्त कुत्रे नष्ट करण्यात आले, असं कराची महापालिकेचे प्रवक्ता सत्तार जावेद यांनी सांगितलं.
महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही वेगळीच मोहीम राबवल्यामुळे सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर पडलेला कुत्र्यांचा खच हटवत आहेत.