इस्लामाबाद : कथित हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने आणखी आरोप केले आहेत. दहशतवाद पसरवणे आणि तोडफोडीचा आरोप पाकिस्तानने कुलभूषण यांच्यावर केला आहे.

कथित हेरेगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने दाद मागितल्यावर कूलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती आली. मात्र आता दहशतवाद पसरवण्याचा आरोप करत पाकिस्तानने पुन्हा कुलभूषण यांच्याविरोधात कट रचला आहे.

पाकिस्तानची भारतीय अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर विविध खटले दाखल केले आहेत. त्यापैकी कथित हेरगिरीच्या प्रकरणावरच सुनावणी पूर्ण झाली आहे. माहिती मागण्यासाठी पाकिस्तानने 13 भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची परवानगी मागितली होती. मात्र भारताने ही मागणी फेटाळल्याचं वृत्त आहे.

पाकिस्तानने त्या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा केलेला नाही. जाधव यांना कोण निर्देश देत होतं, त्याच्यापर्यंत पोहोचायचं असल्याचा दावा पाकने केला आहे. याशिवाय पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या नौदलातील सेवेची फाईल, पेंशनचा बँकेतील तपशील आणि मुबारक हुस्सैन पटेल या नावाने जारी करण्यात आलेल्या पासपोर्टची माहिती मागवली आहे.

पटेल या नावाने पासपोर्ट का जारी करण्यात आला आणि हा पासपोर्ट बनावट आहे का, याची पडताळणी करण्याची मागणी पाकने केली आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कुलभूषण यांच्या मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या संपत्तीची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे, जी पटेल या नावाने खरेदी केली आहे.

संबंधित बातम्या :

आईवर भारतीय अधिकारी ओरडले, कुलभूषण जाधवांचा कथित व्हिडिओ


जाधव कुटुंबीयांना अपमानित करणं हे आधीच ठरलं होतं?


‘पाकिस्तान मुर्दाबाद’... कुलभूषण प्रकरणी शिवसेनेचा संसदेत एल्गार


पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न


टिकली-बांगड्या उतरवल्या, मराठीतही बोलू दिलं नाही


कुलभूषण यांच्या आई, पत्नी भारतात, सुषमा स्वराज यांच्याशी भेट


कान, डोक्यावर जखमांचे निशाण, पाकिस्तानकडून जाधवांचा छळ?