फ्लोरिडा : अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलँडोमध्ये झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत ओबामांनी माहिती दिली आहे. मात्र हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेनं केला याबाबत ओबामांनी खुलासा केला नाही.
या हल्ल्याची जबाबदारी आयसीसनं स्वीकारल्याचा दावा अमाक या आयसिसच्या वृत्तसंस्थेन केला आहे. हल्लाखोर अफगाण वंशाचा अमेरिकन नागरिक असून त्याचं नावं ओमार मतीनं असल्याचं समोर येतं आहे.
ओरलँडोमधील पल्स या गे नाईट क्लबमध्ये रविवारी ओमाननं अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 50 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर तब्बल 53 जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ओमानचा मृत्यू झाला आहे.