Novavax : नोवावॅक्स कंपनीने त्यांची कोरोनावरची लस ही 90 टक्के प्रभावी असल्याचा त्यांच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलनंतर जाहीर केलंय. अमेरिकेत या ट्रायल पार पडल्या. गेल्या वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी ज्या लशींकडे जगाचं लक्ष होतं, त्यापेकी एक ही नोवावॅक्सची लस होती. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर 90 टक्के प्रभावी असून हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्यांना 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
बिल गेट्स यांनाही या लशीला आर्थिक सहाय्य केलं होतं. मात्र ट्रायल्स रखडल्याने ही लस इतर लशींच्या स्पर्धेत थोडी मागे पडली होती. मात्र ता 90 टक्के प्रभावी लस असल्याचा त्यांनी दावा केलाय जो मॉडर्ना आणि फायझरच्या बरोबरीचाच आहे. तिसऱ्या टप्प्यात लसीची चाचणी ही 30,000 रुग्णांवर करण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारी जाहीर करताना कंपनीच्या निर्मात्यांनी सांगितले की, नोव्हावॅक्सच्या विकसित प्रथिने आधारित लस उमेदवाराचे नाव NVX-CoV2373 आहे. जी हलक्या आणि गंभीर स्वरुपाच्या आजारांवर 100 टक्के सुरक्षा देते. या लसीची कार्यक्षमता 90.4 टक्के आहे.
कोरोना लसीच्या डोसची नोंदणी करण्यात भारताने केली आहे. यासाठी अमेरिकेच्या नोवावॅक्सला पहिली पसंती दिली आहे.भारताकडून तब्बल 1 अब्ज 60 कोटी कोरोना लसीच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे सीरम इन्स्टिट्यूट याअगोदरचं ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रॅजेनेकासोबत मोठ्या प्रमाणात लस तयार करत आहे.
Novavax कंपनीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत कोविड 19 लस उत्पादन करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 2021 मध्ये NVX-CoV2373 चे एक अब्ज डोस तयार करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट या लशीतील अँटिजन घटक तयार करणार आहे.