अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यात आज तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही देशांमधील पूर्वीचे ताणले गेलेले संबंध दूर सारत दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी हस्तांदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत फक्त दोघांचे अनुवादक उपस्थित होते.
डिन्यूक्लियरायझेशन म्हणजे अण्वस्त्रमुक्ती करारावर दोन्ही देशाच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या.
चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांची प्रतिनिधी मंडळ स्तरावरही चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांमधील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर ट्रम्प यांनी किम यांचं कौतुक केलं. आगामी काळात या दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहतील असंही ट्रम्प म्हणाले.