प्योंगयोंग (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचे कारनामे जगाला हादरवून सोडणारे असतात. सध्या त्याच्या क्रूरतेचं आणखी एक उदाहरण चर्चेत आहे. ब्रिटनमधील डेली स्टारच्या वृत्तानुसार, किमने आपल्या एका जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकून मृत्यूदंड दिला. पिराना हा जगातील सर्वात हिंस्र मासा समजला जातो.


किमने प्योंगयोंगमधील आपल्या रॉन्गसॉन्ग या निवासस्थाळी एक मोठा तलाव बनवलेला आली. या तलावात माणसांना आपल्या दातांनी जिवंत फाडून खाणाऱ्या पिराना माशांना पाळलं आहे. जनरल आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा संशय आल्याचं लक्षात येताच, किमने त्याचे हात आणि धड वेगळं केलं आणि पिराना माशांच्या तलावात फेकलं.

मात्र जनरलचा मृत्यू पिराना माशांच्या हल्ल्यात झाला की त्याआधीच, हे अद्याप समजू शकलेलं नाही. किमच्या या क्रूरतेची चर्चा केवळ उत्तर कोरियातच नाही तर जगभरात आहे. मात्र या जनरलचं नाव वृत्ता प्रकाशित केलेलं नाही.

हिंस्र मासा म्हणून पिरानाची ओळख
किम जोंग उनने हे पिराना मासे ब्राझीलवरुन मागवले होते. पिरानाची हिंस्र मासा अशी ओळख आहे. या माशााचे दात एवढे तीक्ष्ण असतात की, अवघ्या काही सेकंदात हा मासा माणसाची चिरफाड करु शकतो. जगभरात या माशांची ओळख शाकाहारी अशीच आहे. पिरानाच्या सुमारे 60 वेगवेगळ्या प्रजाती संपूर्ण जगभरात आढळतात.

अनेक अधिकाऱ्यांना शिक्षा
किमने याआधीच क्रूरतेचा कळस गाठला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबती बातचीत निष्फळ ठरल्याने किमने आपल्या अमेरिकन राजदूताला मृत्यूदंड दिला होता. किमने त्याच्या एका मंत्र्यालाही तोफेच्या तोंडी दिलं होतं. मात्र अधिकाऱ्यांना मृत्यूदंड देण्याबाबतच्या बातम्या काही वेळा खोट्याही ठरल्या आहेत.

पिरानाने भरलेल्या तलावात फेकण्याची कल्पना जेम्स बॉण्डने प्रेरित
सूत्रांच्या दाव्यानुसार, किम जोंग उनने 1965 मध्ये आलेल्या 'जेम्स बॉण्ड' चित्रपटातून प्रेरणा घेत हे कृत्य केलं. 'यू ओनली लिव ट्वाईस'चा विलन ब्लोफेल्डकडे पिराना माशांनी भरलेला एक तलाव असतो, ज्यात तो आपल्या सहकाऱ्याला फेकतो.

लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी शिक्षा
ब्रिटेनच्या गुप्तचर विभागाच्या दाव्यानुसार, पिरानाने भरलेल्या तलावात फेकणं ही किमच्या क्रूर शिक्षांपैकी एक आहे. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठी तो शत्रूंना अशी शिक्षा देते. तो याचा वापर राजकीय दबावासाठी करतो. याआधी किम आपल्या कुटुंबातील लोकांना तसंच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाषणादरम्यान टाळ्या न वाजवल्याने मारलं आहे.