न्यूयॉर्क : आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तसंच एखादी व्यक्ती स्पेशल असल्याचं सांगण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. पण कधीकधी वेगळं काही करण्याचा प्रयत्न त्यांना फारच महागात पडतो.


अमेरिकेच्या कॅनजस शहरात राहणाऱ्या सेथ डिक्सन नावाच्या एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. डिक्सनला गर्लफ्रेण्ड रुथ सलासला लग्नासाठी प्रपोज करायचं होतं.

या प्रपोजलसाठी त्याने 3000 डॉलरची (सुमारे 2 लाख रुपये) हिऱ्याची अंगठी खरेदी केली. प्रपोज करण्यासाठी ठिकाण म्हणून त्याने नदीवर बनलेल्या पुलाची निवड केली. सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण अंगठी घालण्याची वेळ आली, तेव्हा असं काही घडलं ज्याची अपेक्षा डिक्सनेही केली नव्हती.

डिक्सनने अंगठी देण्यासाठी बॉक्स उघडताच तो खाली पडला आणि त्यामधील अंगठी नदीत पडली. हे कळल्यानंतर त्याच्या जवळपास 15 मित्रांनी अंगठी शोधण्यासाठी नदीत उडी मारली, पण त्यांना यश मिळालं नाही.

'उबर'मध्ये काम करणारा डिक्सन मागील चार वर्षांपासून रुथला डेट करत होता. त्याचं प्रपोजल जरी अविस्मरणीय ठरलं तरी अंगठी नदीत पडल्याने नुकसान मात्र मोठं झालं.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/MailOnline/status/907793471548776448