या तिन्ही शास्त्रज्ञांमुळे लेझर फिजिक्समध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडलं, असे पुरस्कार समितीने नमूद केले आहे.
अमेरिकन शास्त्रज्ञ आर्थर अश्किन यांना पुरस्काराची निम्मी रक्कम मिळेल, तर उर्वरित निम्मी रक्कम मोउरो आणि स्टिरकलँड यांना समसमान विभागून दिली जाईल.
विशेष म्हणजे, डोना स्टिरकलँड यांच्या रुपाने भौतिकशास्त्राचं नोबेल तब्बल 55 वर्षांनंतर महिलेला मिळालं आहे.
भौतिकशास्त्राचं नोबेल जाहीर झाल्यानंतर आणखी एका विशेष गोष्टीची नोंद झाली, ती म्हणजे के. आर्थर अश्किन हे सर्वात वयस्कर नोबेल विजेते ठरले आहेत.
दरम्यान, काल (1 ऑक्टोबर) शरीरविज्ञानशस्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर झालं. कॅन्सर अर्थात कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. कॅन्सर थेरपीतील महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं.
जेम्स पी अलीसन यांनी प्रोटीनचा अभ्यास करुन रोगप्रतिकार प्रणालीबाबत महत्त्वाचं संशोधन केलं. अलीसन आणि तासुकू होन्जो यांनी अशी थेरपी विकसित केली आहे, ज्यामुळे शरिरातील पेशींमधील रोगप्रतिकारक प्रणालीला कॅन्सर ट्यूमरशी लढण्यासाठी सक्षम केलं जातं. कॅन्सर थेरपीबाबतच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल या दोघांचा सन्मान करण्यात आला.