न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2016 05:19 PM (IST)
ऑकलंड : नवीन वर्षाचं स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात झालंय. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2017 चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतलीय. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील सिडनी देखील नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर नववर्षानिमित्त नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.