रिओ दी जिनेरो: आणखी एका देशाच्या राजदुताची हत्या झाली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीच्या प्रियकरानेच राजदुताची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ब्राझीलमधील ग्रीसचा राजदूत या हत्याकांडात बळी पडला आहे. हा राजदूत सोमवारपासून बेपत्ता होता. सुट्टीनिमित्त बाहेर गेलेले हे राजदूत परतलेच नव्हते.

मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर, राजदुताच्या पत्नीनेच तिच्या बॉयफ्रेण्डच्या मदतीने काटा काढल्याचं उघड झालं.

याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. अधिक तपास केल्यानंतर राजदुताच्या पत्नीने हत्या केल्याचं कबूल केलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

मात्र स्वत:चं रक्षण करताना पतीचा मृत्यू झाला, असा दावा पत्नीने केला आहे.