नवी दिल्ली: पाकिस्तान आपल्या नापाकी कारवाया थांबवण्याचं नाव घेत नाहीय. पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा आपल्या नापाकी कारवायांचे दर्शन जगाला घडवले आहे.


 

नवाज शरीफ यांनी आपली वाईट नजर काश्मीरवर कायम ठेवली असून यासाठी काश्मीरचा मुद्दा सर्व जगात उठवण्यासाठी नवाज शरीफ यांनी 22 खासदारांची एक टीम बनवली आहे. या टीमचे त्यांनी विशेष दूत म्हणून नामकरणही केले आहे. ही 22 जणांची टीम आता इतर देशात जाऊन काश्मीरचा मुद्दा मांडणार आहेत.

 

तर दुसरीकडे आज जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ''पाकिस्तानने काश्मीरमधील जनतेला भडकवण्याचे उद्योग बंद करावेत. संपूर्ण देशाला काश्मीरमध्ये शांतता हावी आहे.'' असे त्यांनी यावेळी पाकिस्तानला बजावले. तसेच या प्रश्नी जे चर्चेसाठी अनुकूल असतील, त्यांच्याशीच चर्चा होऊ शकेल. हिंसाचार करणाऱ्याशी चर्चा कधीही होणार नाही, असेही त्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.

संबधित बातम्या

काश्मीरमधील रक्तपात केवळ मोदीच थांबवू शकतातः मेहबुबा मुफ्ती


 

काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच देशवासीयांची इच्छा: राजनाथ