न्यूयॉर्क: जगाचं लक्ष वेधणाऱ्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या  या निवडणुकीत पहिलं मतदान हे थेट अंतराळातून केलं गेलं. अमेरिकेतील नासा या अंतराळ संस्थेनं ही माहिती दिली आहे.


शेन किमब्रूव्ह असं अंतराळातून मतदान करणाऱ्या अंतराळवीराचं नाव आहे. 19 ऑक्टोबरला अंतराळवीर शेन आणि त्याचे सहकारी हे यांचं यान अंतराळात झेपावलं होतं. अंतराळात ते पुढचे ४ महिने काढणार असल्यानं त्यांनी थेट अंतराळातून निवडणुकीसाठी मतदान केलं.

1997 सालापासून अमेरिकेत अंतराळवीर टेक्सास कायद्यानुसार, अंतराळातून मतदान करत आले आहेत. अंतराळातून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या अमेरिकन अंतराळवीराचं नाव डेविड वोल्फ होतं. त्यानं रशियाचं अंतराळ स्टेशन मीरमधून आपलं मतदान केलं होतं.