Onion Farmers: कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. एकीकडे खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती, शेतमालाला मिळणारा कमी दर या अडचणीत शेतकरी असताना आता अवकाळी पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. दरम्यान, कांद्याला आधीच चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशातच आता नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक झोपले आहे.
काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गारपीट झाली. यामुळं अनेक ठिकाणी कांदा पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. एवढ्या पंधरा दिवसात कांदा काढण्यास येमार होता. पण त्यापूर्वीच गारपीटीने मोठा फटका बसला आहे. आता अशा नुकसान झालेल्या कांद्याला खूपच कमी दर मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हा कांदा आता चाळीमध्येही टाकता येणार नाही. त्याची साठवणूक करकता येणार नाही. त्यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितेल.
कांदा पिकाबरोबरच द्राक्ष, मिरची पिकाचेही नाशिक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कालच्या पावसानं चक्रीवादळाबरोबर मोठा फाऊस झाला. ढोबळी मिरचीचे पीक तोडणीला आले असताना या अवकाळी पावसाचा मोठा फटका आमच्या मिरची पिकाला बसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. 100 टक्के नुकासन झाले आहे. शेडनेटसाठी 5 ते 6 लाख रुपयांचा खर्च आहे. तसेच यासाठी औषधांता खर्च देखील मोठा आहे. पण अशा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मार्केटमध्ये ढोबळी मिरचीला चांगला दर असताना असा फटका बसला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
काल नाशिक जिल्हा आणि परिसरात झालेला पाऊस मोठा होता. तसेच वाऱ्याबरोबर वादळी वारा देखील होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं आडवी झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे वाढती महागाई, इंधनाचे वाढते दर, खतांच्या वाढत्या किंमत यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. असातच आता अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आताच कोरोनाच्या संकटाचा धोका कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच त्याला पुन्हा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.