म्युनिक(जर्मनी): जर्मनीमधील म्युनिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका मॉलमध्ये शुक्रवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या या गोळीबारामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून हल्लेखोरानी स्वतःलाही गोळी मारुन घेतली.

 

 

या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा गोळीबार तबब्ल दोन तासाहून जास्त काळ सुरु होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मॉलमधील जमावाला बाहेर काढलं. हल्ल्यामध्ये तीन हल्लेखोर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

 

हल्ल्यातील सर्व भारतीय सुखरुप

हल्लेखोरांपैकी एकजण इराणचा असल्याची माहिती आहे. 18 वर्षांचा हा तरूण दोन वर्षांपासून म्युनिचमध्ये राहत होता. या हल्यामागे दहशतवादी आहेत का? याचा जर्मनी पोलीस तपास करत आहेत.

 

 

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जर्मनीला सर्व प्रकारची मदत करण्यात आश्वासन दिलं असून हल्ल्याचा निषेध केला आहे. तर हल्ल्यात सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे.