Monkey Pox Cases Increase in Britain : कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या महत्त्वाच्या देशांपैकी एक देश म्हणजे, ब्रिटन. कोरोनामधून सावरतो न सावरतो, तोच ब्रिटनमध्ये आता मंकीपॉक्स (Monkey Pox)नं धुमाकूळ घातला आहे. ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 20 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. फक्त एका इंग्लंड शहरात मंकीपॉक्सचे 11 रुग्ण आढळले आहेत. 


ब्रिटन सरकारनं शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना, मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरणारी लस मिळवण्यासाठी सरकारकडून जोमाने प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मंकीपॉक्स हा देवी रोगासारखाच आजार आहे. 


मंकीपॉक्सचे परिणाम कमी करणाऱ्या लसींची खरेदी 


जी-7 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान, ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी शुक्रवारी बोलताना सांगितलं की, मंकीपॉक्सची लागण झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. आम्ही मंकीपॉक्सवर प्रभावी असणाऱ्या लसींची खरेदी केली आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही ब्रिटन सरकारकडून नागरिकांना केलं जात आहे. तसेच, मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तींचे कपडेही न वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. 


मंकीपॉक्सचा व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज प्रसारित होत नाही आणि UK मध्ये मंकीपॉक्स संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. UKHSA चे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. सुसान हॉपकिन्स यांनी सांगितलं की, आम्ही मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करत आहोत. तसेच, त्यांना यासंदर्भात योग्य ती माहिती देऊन काळजी घेण्याचं आवाहन करत आहोत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Monkeypox : कोरोनानंतर आता नव्या ‘मंकीपॉक्स’ विषाणूचा शिरकाव, काय आहेत ‘या’ विषाणूची लक्षणे? जाणून घ्या...