न्यूयॉर्क : एक डिसेंबरपर्यंत अमेरिकेत कोविड-19 च्या बळींचा आकडा 3 लाखांच्या जवळ जाण्याची शक्यता एका मॉडेलने वर्तवली आहे. वेळीच काळजी घेतली तर त्यातील जवळपास 70 हजार रुग्णांचा जीव वाचू शकतो. आत्ताच्या घडीला कोरोनामुळे अमेरिकेत 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. Institute for Health Metrics and Evaluation या संस्थेच्या अहवालानुसार 1 डिसेंबरपर्यंत अमेरिकेत 2 लाख 95 हजार 11 बळी जाऊ शकतात.


अमेरिकेत कोरोना विषाणू संसर्गाने हाहाकार माजला आहे. अशातच इथल्या नागरिकांना धोक्याचा इशारा एका अहवालातून समोर आला आहे. एक डिसेंबर तीन लाखांच्या आसपास मृतांचा आकडा जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, यातील काही जीव वाचवले जाऊ शकतात, असेही या अहवालात म्हटलं आहे. 95 टक्के लोकांनी मास्क घातला तरी हा आकडा 2 लाख 27 हजार 771 वर येऊ शकतो म्हणजे 67 हजारांपेक्षा जास्त लोक वाचू शकतील.


 डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका; टिकटॉक, वीचॅटवर बंदी घालणारा आदेश जारी


अमेरिकेत आत्ता जवळपास 49 लाख कोरोनाबाधित


अमेरिकेच्या Centers for Disease Control and Prevention या संस्थेने सुद्धा 29 ऑगस्ट पर्यंत 1 लाख 81 हजार 031 बळी जातील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिकेत आत्ता जवळपास 49 लाख कोरोनाबाधित आहेत. मे महिन्यात बाधितांची संख्या रोज सरासरी 20 हजारांनी वाढत होती. जुलैमध्ये दररोज सरासरी 60 हजारांपेक्षा जास्तीने वाढ होत होती तर आत्ता रोज सरासरी वाढ 60 हजारांपेक्षा कमी आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या मतदानाला सुरुवात होणार आहे तोपर्यंत बाधितांचा आकडा वाढणं कमी होईल, अशी आशा डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे.


डॉ. फाऊची अमेरिकेतील National Institute of Allergy and Infectious Diseases या संस्थेचे संचालक आहेत आणि अमेरिकेतील कोरोनाविरोधी लढ्यातील मोठं नाव आहे.


Patanjali Ayurved | कोरोनिल औषधामुळे रामदेवबाबा अडचणीत, मद्रास हायकोर्टाकडून 10 लाखांचा दंड