नवी दिल्ली: जागतिक नेत्यांच्या रांगेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वरचष्मा बघायला मिळतोय. कारण जागतिक रँकिंगमध्ये नरेंद्र मोदींनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलं. यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर आहेत, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱ्या स्थानावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.
विशेष म्हणजे मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही मागे टाकलं आहे. 2015 साली या रँकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते.
जागतिक रँकिंग
अँजेला मर्कल (चान्सलर, जर्मनी)
इमॅनुअल मॅक्रां (फ्रान्सचे अध्यक्ष)
नरेंद्र मोदी (पंतप्रधान, भारत)
थेरेसा मे (पंतप्रधान, इंग्लंड)
शी जिनपिंग (अध्यक्ष, चीन)
व्लादिमीर पुतीन (अध्यक्ष, रशिया)
सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद (सौदीचे राजे)
नेत्यानाहू (इस्रायल पंतप्रधान)
हसन रोहानी (पंतप्रधान, इराण)
इद्रोगान (अध्यक्ष, तुर्कीस्तान)
डोनाल्ड ट्रम्प (अध्यक्ष, अमेरिका)
जगभरात मोदींबाबतचं मत काय?
भारतात मोदीप्रेमींची संख्या जशी वाढली आहे, तशीच ती जगभरातही वाढल्याचं दिसून येतं. मोदींवर प्रेम करणाऱ्या देशांत व्हिएतनाम, फिजी आणि अफगाणिस्तान यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर लागतो.
तर मोदींचा तिरस्कार करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. मोदींचा सर्वाधिक तिरस्कार पाकिस्तानात केला जातो. गेल्या दोन वर्षात पाकिस्तानात मोदींना नापसंती दर्शवणाऱ्यांचा आकडा हा -43 वरुन -54 इतका वाढला आहे.
गॅलप इंटरनॅशन असोसिएशनने 74 देशांतील लोकांना विचारलेल्या प्रश्नांवरुन, हा सर्व्हे जाहीर केला. त्यानुसार नरेंद्र मोदी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानाला मिळालेलं हे सर्वोत्तम रँकिंग आहे.
सर्व्हे कसा झाला?
सी वोटर इंटरनॅशनलचे यशवंत देशमुख यांनी या सर्व्हेबाबत अधिक माहिती दिली.
“गॅलप इंटरनॅशन असोसिएशन दरवर्षी जागतिक नेत्यांचा सर्व्हे करते. कोणता नेता सर्वाधिक लोकप्रिय आहे, हे या सर्व्हेवरुन समजतं. जगातील 75 देशांतील एजन्सींनी गॅलपसोबत सर्व्हे केला.