बिजिंग : भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला आहे. तिने दक्षिण अफ्रिका, वियतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या सौंदर्यवतींना मागे टाकत हा किताब पटकावला.
चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेसाठी जवळपास 130 देशातून सौंदर्यवतींना सहभागी झाले होते. 2016 मधील मिस वर्ल्ड प्यूटो रिकोची स्टेफनी डेल वेलीने विश्व सुंदरीचा मुकुट मानुषीच्या डोक्यावर घातला.
20 वर्षांची मानुषी छिल्लर ही मुळची दिल्लीची रहिवासी असून ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे.
1966 पर्यंत आशियातील कोणत्याही महिलेला मिस वर्ल्डचा किताब मिळाला नव्हता. पण 1966 मध्ये मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या रिता फारिया हिने सर्वात पहिला हा बहुमान मिळवला.
यानंतर तीन दशकांनी म्हणजे 1994 मध्ये ऐश्वर्या रायने पुन्हा इतिहास रचत मिस वर्ल्ड हा किताब पटकावला. ऐश्वर्यानंतर अनेक भारतीय सौंदर्यवतींनी हा किताब आपल्या नावावर केला. यामध्ये डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999) आणि प्रियंका चोप्राने 2000 मध्ये हा किताब पटकावला होता.
मानुषी छिल्लरचा अल्प परिचय
मानुषीचा जन्म 14 मे 1997 रोजी झाला. तिचे वडील मित्रबसू व्यवसायाने डॉक्टर असून, सध्या दिल्लीतील इनमास इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत. तर तिची आई नीलम इब्मास कॉलेजमध्ये बायोमॅट्रिक्सची प्राध्यापिका आहे.
25 जून 2017 मध्ये मानुषीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2017 ने गौरवण्यात आलं होतं. ती अशियातील पहिली विश्वसुंदरी रिता फारियाला आदर्श मानते.
मेडिकलच्या विद्यार्थिनीसह ती एक उत्तम कुचिपुडी नृत्यांगना देखील आहे. तिने प्रसिद्ध कुचिपुडी नर्तक राजा आणि राधा रेड्डी तसेच कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे.
भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2017 08:12 PM (IST)
भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला आहे. तिने दक्षिण अफ्रिका, वियतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या स्पर्धकांचा पराभव करुन हा किताब पटकावला.
फोटो सौजन्य : ANI
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -