मेक्सिको : मेक्सिकोमध्ये फटकांच्या बाजारात लागलेल्या आगीत 29 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजधानी मेक्सिको सिटीपासून 32 किमी अंतरावर लागणाऱ्या सॅन पाब्लिटो या फटाका बाजारा स्फोट झाला.


सुरुवातीला एका स्टॉलमध्ये आग लागली, त्यानंतर स्फोटांची मालिकाच सुरु झाली. यानंतर संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आणि लोकांची धावपळ सुरु झाली. यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन यंत्रणांसाठी ही आग विझवणं म्हणजे महाकठीण काम होतं. सर्व फटाके विझल्यानंतर अग्निशमन दलानं आग विझवण्याचं काम हाती घेतलं. आग इतकी मोठी आणि भीषण होती की बचावकार्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली.

सॅन पाब्लिटो बाजारात 2005 आणि 2006 मध्येही आग लागली होती. सप्टेंबर 2005 मध्ये मेक्सिकोच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या आधी अनेक स्फोट झाले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने लोक जखमी झाले होते.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/ANI_news/status/811402287004270592