मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया सध्या इस्त्राइलच्या दौऱ्यावर आहेत. याच वेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावरुन ट्रम्प यांना ट्रोल करणं सुरु केलं आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ 11 सेकंदाचा आहे. यामध्ये ट्रम्प रेड कार्पेटवर पत्नी मेलेनियासोबत चालताना दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची सारा हे देखील सोबत होते. काही अंतर चालल्यानंतर ट्रम्प आपली पत्नी मेलेनियाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचवेळी मेलेनिया त्यांचा हात झटकून देते.

ट्रम्प आणि मेलेनिया यांचा हाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेलेनिया यांनी ट्रम्प यांचा हात का झटकला? यावरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी याबाबत बरेच तर्कवितर्क लढवले आहेत.

ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीत कुरबुरी तर नाहीत ना अशा चर्चांनाही या व्हिडिओमुळे उधाण आलं आहे.

VIDEO: