पॉप सिंगर अरियाना ग्रांडे सुरक्षित असली तरी ती कोलमडली आहे. ज्यावेळी स्फोट झाला, तेव्हा अरियानाचा परफॉर्मन्स सुरु होता. आपल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर दु:खी अरियानाने आज सकाळी (मंगळवार) ट्वीट करुन लोकांची माफी मागितली आहे. "अगदीच कोलमडले आहे...मी यासाठी मनापासून माफी मागते, माझ्याकडे शब्द नाहीत, असं ट्वीट तिने केलं आहे."
https://twitter.com/ArianaGrande/status/866849021519966208
मॅन्चेस्टरच्या स्थानिक वेळेनुसार अरियाना ग्रांडेने पहाटे 4 वाजता ट्वीट केलं. अरियानाचं हे ट्वीट तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त युझर्सनी रिट्वीट केलं असून साडे पाच लाखांहून जास्त ट्विपल्सनी ते लाईक केलं आहे.
कोण आहे अरियाना ग्रांडे?
- अमेरिकेची प्रसिद्ध पॉप सिंगर
- हॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये काम
- 'डेंजरस वूमन' नावाचा म्युझिक अल्बम
- 'डेंजरस वूमन' नावानेही ओळख
- अवघ्या 21 व्या वर्षात प्रसिद्धी
- टाइम मासिकाच्या 100 प्रभावी व्यक्तींमध्येही स्थान
- एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक पुरस्कारानेही सन्मानित
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
https://twitter.com/narendramodi/status/866826112889835523
काय आहे मॅन्चेस्टर एरिना?
मॅन्चेस्टर एरिना हे इंग्लंडमधील सर्वात मोठं सभागृह आहे. याला ब्रिटिश एरिना असंही म्हणलं जातं. या सभागृहाची आसन क्षमता 21 हजार असून, 2002 मधील कॉमनवेल्थ खेळात या सभागृहाचा वापर करण्यात आला होता.
विशेष म्हणजे याच सभागृहात बॉक्सिंग आणि WWE चेही सामने भरवले जातात. ते पाहण्यासाठी अनेकजण प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते.