लंडन : ब्रिटनचे राजपूत्र प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांनी अॅफ्रा विन्फ्रेला एक मनमोकळी मुलाखत दिली आहे. त्यात या जोडप्याने आपल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. या मुलाखतीत राजपूत्र प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांनी आपल्या मुलाच्या रंगावरुन राजघराणं चिंतेत असल्याचा खुलासा केला आहे.


मेगन मर्केलने या गोष्टीवरुन ब्रिटिश माध्यमांनी केलेल्या निगेटिव्ह कव्हरेज दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राजघराण्यात राहत असूनही आपल्याला एकटं वाटायचं असंही मेगन मर्केलने स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मुलाच्या रंगावरुन त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला असंही तिने या मुलाखतीच्या दरम्यान स्पष्ट केलं.


मुलाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी त्याच्या रंगावरुन राजपरिवारातल्या सदस्यांना चिंता वाटत होती. यावर परिवारातल्या सदस्यांनी प्रिन्स हॅरीशी चर्चाही केली होती असाही तिने खुलासा केला. पण हे सदस्य कोण होते त्यांची नावे मात्र मेगन मर्केलने सांगण्यास नकार दिला. शाही परिवारातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सुरक्षा व्यवस्थाही नाकारली होती असंही मेगन मर्केलने स्पष्ट केलं.


खुशखबर! ब्रिटनच्या शाही घराण्यात होणार नव्या पाहुण्याचं आगमन..


मेगनने सांगितलं की एक वेळ अशी आली होती की ती पूर्णपणे तुटली होती. त्यावेळी तिच्या मनात आत्महत्येचा विचारही आला होता असही तिने सागितलं. अशा प्रसंगी नेमकं काय करावं हे समजत नव्हतं असं प्रिन्स हॅरीने सांगितलं. सोशल मीडियावर आपल्यावर गोल्ड डिगर आणि असे अनेक काही आपत्तीजनक कमेन्ट केल्या जातात असंही मेगन मर्केल म्हणाली.


गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क टाईम्समध्ये 'द लॉस वी शेअर' या मथळ्याखाली लिहलेल्या एका लेखात डचेस ऑफ सस्सेक्स मेगन मर्कलने आपल्याला गर्भपातामुळे मुल गमवावं लागल्याचे सांगितलं होतं. तो अनुभव आपल्यासाठी असह्य शोक असल्याची भावना तिने व्यक्त केली.


प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल हे आपल्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागताच्या तयारीत आहेत. बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्याने ही बातमी दिली आहे. या शाही जोडप्याला या आधी एक अपत्य असून त्याचं नाव आर्च हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर असं आहे. त्याचं वय दीड वर्ष आहे.


The Losses We Share | डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्कलचा गर्भपात