काराकस : अमेरिकन फास्टफूडची चेन असलेल्या मॅकडोनल्ड्स या कंपनीने व्हेनेझुएलामध्ये आपल्या मॅक हॅम्बर्गर या प्रॉडक्टवर बंदी आणली आहे. सप्लायर्सना होणाऱ्या त्रासामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचं कळले आहे.


 

कंपनीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, मॅकडोनल्ड्स व्हेनेझुएलातील ही परिस्थीती सामान्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. आपल्या डिस्ट्रिब्यूटर्सना क्वालिटी प्रॉडक्ट देण्यासाठी काही पर्यायांचा विचार कंपनी करत असून ते क्वार्टर पाउंडर बर्गर, सीबीओ आणि मॅकनिफिका सारख्या अन्य प्रॉडक्ट्सच्या सप्लायर्सशी चर्चा सुरू असून लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाईल.

 

यापूर्वी जानेवारी ते नोव्हेंबर 2015 दरम्यान मॅकडोनल्ड्सने प्री-कुक्ड बटाट्याच्या कमतरतेमुळे व्हेनेझुएलामध्ये फ्रेंच फ्राइजची विक्री बंद केली होती. यानंतर नोव्हेंबरपासून जास्त किंमतीने विक्री पुन्हा सुरू केली होती.