लंडनमध्ये भर रस्त्यात दिसेल त्याला भोसकलं, एका महिलेचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2016 03:16 AM (IST)
लंडन : इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीने लोकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहे. पोलिसांनी रसल स्क्वेअरमध्ये एका व्यक्तीला अटक केली आहे. रसल स्क्वेअरवर एक पुरुष चाकूने नागरिकांवर हल्ला करत असून त्याने काही लोकांना जखमी केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस अम्ब्युलन्ससह घटनास्थळी दाखल झाले. हा दहशतवादी हल्ला आहे का, याचीही चाचपणी पोलिस करत आहेत. हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.