दुबईत विमानाचं क्रॅश लॅण्डिंग, प्रवासी थोडक्यात बचावले
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 10:21 AM (IST)
दुबई : एमिराट्स एअरलाईनच्या प्रवासी विमानाला दुबईमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. या विमानात 275 प्रवासी आणि क्रू-मेंबर होते. EK521 हे विमान भारतातील तिरुअनंतपुरममधून दुबईला निघालं होतं. पण दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँण्ड होत असताना, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता अपघात झाला. यामुळे विमानाचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने सगळे प्रवासी सुखरुप आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर काही विमानं माकटॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली आहेत.