बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ‘मराठा ट्राईब’ या फेसबुक पेजवर पाठिंबा देणारी पोस्ट करण्यात आली आहे.
मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण द्यावं, अशी मागणी ‘मराठा कौमी इतेहाद’ने केली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?
“ ‘मराठा कौमी इतेहाद’ हे भारतातील मराठा मोर्चाला पूर्ण पाठिंबा देत आहे. मराठा समाजावर अन्याय होत आहे, त्याचा मी निषेध करतो. मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळायलाच हवं. तो त्यांचा राष्ट्रीय हक्क आहे. त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सहभागी आहोत. पाकिस्तानातील मराठ्यांना न्याय मिळतो, मग भारतातील मराठ्यांना का नाही? पाकिस्तानातील मराठा समाज याचा तीव्र निषेध करतो”.
प्रमुख, ‘मराठा कौमी इतेहाद’ (पाकिस्तान)
वदेरा दिन मोहम्मद मराठा बुगटी
कोण आहेत पाकिस्तानातील मराठे?
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मराठ्यांना अफगाणिस्तानमध्ये नेलं जात होतं. पण ते शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांना बलुचिस्तानात ठेवण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर झालं. पण त्यांनी त्यांच्या नावात मराठा नाव अजूनही जोडलेलं आहे. मराठा असण्याचा त्यांना अभिमान आहे.
संबंधित बातम्या