जुबा (दक्षिण सुदान) : दक्षिण सुदानमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्यांची सुदानमधील स्थानिक माध्यमांच्या मार्फत मिळते आहे. राष्ट्रपती सलवा कीर आणि त्यांचे विरोधक असलेले उपराष्ट्रपती रीक मखार यांच्यातील मुलाखतीदरम्यान राष्ट्रपती भवनाजवळ गोळीबार झाला.
गोळीबारात एकूण किती जणांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, काही रिपोर्टनुसार, 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
गेल्या 20 महिन्यांपासून सुरु असलेलं गृहयुद्ध रोखण्यासाठी 2015 मध्ये शांती करार झाला होता. मात्र, हा करारही हिंसाचार रोखण्यास अपयशी ठरला आहे. हिंसाचारानंतर राजधानी जुबामध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दक्षिण सुदान जगातील सर्वात तरुण देश असून, यंदा सुदान पाचवा वर्धापन दिन साजरा करत आहे.
सलवा कीर आणि रीक मखार यांच्यामध्ये मुलाखत सुरु असताना, दोघांच्याही सुरक्षारक्षकांमध्ये गोळीबार सुरु झाला. जवळपास अर्धा तास गोळीबार सुरु होता, त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्येही हिंसाचार सुरु झाला.