चीनच्या सान्या शहरामध्ये ही स्पर्धा रंगली होती. वेनेसा पोन्स डी लिऑन ही 68व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती स्पर्धक ठरली आहे. थायलँडची निकोलेन पिशापा ही मिस वर्ल्ड 2018ची उपविजेती ठरली आहे.
दरम्यान, यंदाची मिस इंडिया अनुकृती वासनेही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनुकृतीने टॉप 30 मध्ये स्थान मिळवले. मात्र टॉप 12मध्ये प्रवेश करण्यात ती अयशस्वी झाली.
या स्पर्धेत भारत, चिली, फ्रान्स, बांगलादेश, जपान, मलेशिया, मॉरीशस, मेक्सिको, नेपाळ, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड, युगांडा, अमेरिका, व्हेनेझुएला आणि व्हिएतनामच्या मॉडेल टॉप 30 मध्ये पोहोचल्या.