टोकियो : जापानमध्ये अमेरिकेच्या मरीन कॉर्प्सच्या दोन विमानांचा अपघात झाला आहे. हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ-18 आणि सी-१३० या लढाऊ विमानांमध्ये टक्कर झाली. मध्यरात्री २ च्या सुमारास जमिनीपासून 200 मीटर उंचीवर हा अपघात झाला. या अपघातात सापडलेल्या एका एअरमॅनला वाचवण्यात यश आले आहे. मात्र अन्य 6 नौसैनिक बेपत्ता आहेत.
अमेरिकेच्या सुरक्षा विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन मरीन कॉर्प्स हा अमेरिकन सैन्य दलाचा भाग आहे. मरीन कॉर्प्स हे नौदल, हवाई दल आणि लष्कराबरोबर विविध सैन्य अभियानामध्ये सहभागी होत असतात. दक्षिण जापानच्या इवाकूनी येथील मरिन एअर कॉर्प येथून या विमानांनी अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केले होते. दरम्यान ही दुर्घटना झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जापानकडून मिळालेल्या माहितीनुसार सी-130 या मरीन कॉर्पमध्ये हवाई दलाचे सहा कर्मचारी होते. या विमानांचा शोध घेण्यासाठी जापान कडून चार विमाने आणि तीन जहाज तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार सी-130 या विमानात हवाई दलाचे पाच कर्मचारी आणि एफ-18 यात दोन सैन्यकर्मचारी होते. अमेरिकन मरीन्स आणि जपानी नौदलाकडून बेपत्ता नौसैनिकांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरु आहे. तसेच हा अपघात कसा झाला याचादेखील तपास नौदलाकडून सुरू आहे.
जपानमध्ये अमेरिकेच्या दोन लढाऊ विमानांची हवेत टक्कर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2018 12:48 PM (IST)
जापानमध्ये अमेरिकेच्या मरीन कॉर्प्सच्या दोन विमानांचा अपघात झाला आहे. हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ-18 आणि सी-१३० या लढाऊ विमानांमध्ये टक्कर झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -