Malala Yousafzai's Marriage : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. मलालाने असर मलिक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मलालाचा  बर्मिंघम  येथे विवाह सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मलालाने तिच्या लग्नाबद्दल सांगितले. 

मलालाची खास पोस्टमलालाने लग्न सोहळ्यातील फोटो ट्वीटरवर शेअर करून लिहीले , 'आजचा दिवस हा माझ्यासाठी अत्यंत मैल्यवान आहे.'  अनेकांनी  मलालाच्या या ट्वीटवर कमेंट करत मलाला आणि तिचे पती असर यांना शुभेच्छा दिल्या आहे.  मलालाच्या या ट्वीटला 70 हजारापेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून 6 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा फोटो रिट्वीट केला आहे.  मलालाने लग्नासाठी सिंपल ज्वेलरी आणि पिंक कलरचा आउटफिट असा लूक केला होता. 

Rafale Deal : राफेल विमान खरेदी प्रकरणात नवा खुलासा, सुशेन गुप्ता या मध्यस्ताला 7.5 मिलियन युरो दिल्याचा दावा

मलालाचे वडील जियाउद्दीन यूसुफजई यांनी देखील मलालाच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. 2014 साली मलाला नोबेल पुरस्कार विजेती ठरली. तेव्हा मलाला 17 वर्षाची होती.  मलाला युसुफझाईने मुलींच्या शिक्षणाच्या हक्कावर आवाज उठवल्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. सुदैवाने त्यातून ती बचावली. 

Covaxin In Britain Approved List : कोवॅक्सिन लसीचा ब्रिटनच्या APPROVED LIST मध्ये समावेश

Viral Video : मुलीने अजगराचा किस घेतला अन्...पुढे काय घडलं ते पहाच