Bangladesh Fire in Container Depot : बांग्लादेशमधील (Bangladesh) कंटेनर डेपोला भीषण आग लागली आहे. या घटनेमध्ये आत्तापर्यंत जवळपास 35 जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, बांगलादेशातील एका खाजगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री चटगावमधील सीताकुंडा उपजिल्ह्यातील कदमरसूल परिसरात ही घटना घडली. येथील एका बीएम कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागली. या आगीत होरपळून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
रिपोर्टनुसार, कंटेनर डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर काही स्फोट झाले. यामध्ये 35 जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांचा देखील समावेश आहे. ढाका ट्रिब्यूनने रेड क्रेसेंट यूथ चटगांवचे आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्ताकुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी किमान 350 लोक सीएमसीएचमध्ये आहेत.


मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता
बांग्लादेश अग्निशमन सेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर डिपोमध्ये घडलेल्या या घटनेदरम्यान तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.  मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. चटगाव अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण सहाय्यक संचालक मोहम्मद फारूख हुसेन सिकदार यांनी सांगितले की, आग विझवण्यासाठी सुमारे 19 अग्निशमन दल काम करत आहेत आणि सहा रुग्णवाहिकाही घटनास्थळी उपलब्ध आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा: