Major Earthquake May Hit Pakistan : भारताशेजारील देश पाकिस्तानामध्ये (Pakistan Earthquake) विनाशकारी भूकंप येईल, असं भाकित एका शास्त्रज्ञाने केलं आहे. डच भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाकिस्तान (Pakistan) आणि आजूबाजूच्या परिसरात भूर्गभातील हालचाली पाहता, येथे मोठा भूकंप (Earthquake) होण्याची भविष्यवाणी या शास्त्रज्ञाने केली आहे. महत्त्वाचं म्हणजे डच भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्की आणि सीरियातील भूकंप होण्याआधीच काही दिवस भूकंपाची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर तुर्कीतील विनाशकारी भूकंपाचं वास्तव साऱ्या जगानं पाहिलं. त्यामुळे आता शास्त्रज्ञाच्या नव्या दाव्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


पाकिस्तानात विनाशकारी भूकंपाची होणार? 


नेदरलँड-आधारित संशोधन संस्थेने सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा अंदाज या पोस्टद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGEOS) च्या संशोधकाने सांगितलं की, पाकिस्तानमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला वातावरण मोठा चढउतार दिसून आला आहेत, ही भविष्यात येणाऱ्या भूकंपाची लक्षणे ठरु शकतात. 


तुर्की भूकंपाबाबत भाकित करणाऱ्या शास्त्रज्ञाची भविष्यवाणी 


हुगरबीट्स यांनी याआधीही एका व्हिडीओमध्ये पाकिस्तान आणि भारताला भूकंपाला धोका असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तुर्की आणि सीरियामधील भूकंपाच्या काळात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता. तुर्की आणि सीरियामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला भीषण भूकंप झाला, ज्यामध्ये दोन्ही देश उद्ध्वस्त झाले. तुर्की आणि सीरियातील भीषण भूंकपानंतर भूकंपाच्या यादीत भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक असल्याचं सांगितलं होतं. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या आशियाई देशांना तुर्कस्तानसारखा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल,






हुगरबीट्स भूकंपाचा अंदाज कसा वर्तवतात?


डच संशोधक आणि भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स यांनी भूकंपाबाबत नवीन भाकित केलं आहे. फ्रँक हूगरबीट्झ यांनी आणखी एका विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. फ्रँक हुगरबीट्स एक डच शास्त्रज्ञ आहे, त्यांनी भूतकाळात तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपांचा अंदाज व्यक्त केला होता. त्या भूकंपाचा अंदाज लावण्यासाठी गणिती साधनांचा वापर केला आहे. फ्रँक हुगरबीट्स यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे, पण भूकंप नेमका कधी येईल हे निश्चितपणे सांगू शकत नाही. 


पाहा जुना व्हायरल व्हिडीओ : 


या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भीषण भूकंप झाला. त्यादरम्यान हुगरबीट्स यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.






महत्वाच्या इतर बातम्या :


Turkey Earthquake : तुर्कीनंतर आता भारतातही विनाशकारी भूकंप? तुर्कीतील भूकंपाचं भाकित करणाऱ्या वैज्ञानिकाची धक्कादायक भविष्यवाणी