Magnetar Star Magnetic Field : अंतराळामध्ये (Space) अनेक रहस्य लपली आहेत, ज्याची अद्याप संपूर्ण जगाला कल्पनाही नाही, जगभरातील शास्त्रज्ञांकडून या अवकाशातील रहस्यांचा उलगडा करण्यासाठी बरेच संशोधन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या एका ग्रहाचा शोध (Second Earth Found) लावला होता, आता शास्त्रज्ञांनी आणखी एका रहस्याचा उलगडा केला आहे. सूर्याहून (Sun) हजारो पटींनी जास्त लख्ख आणि तेजस्वी असणारा प्रकाश स्त्रोत (Magnetar Star) शास्त्रज्ञांनी शोधला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रकाश आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांच्या ऊर्जेहूनही कैकपटीने जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो.
नेमकी काय आहे 'ही' ऊर्जा?
या चमकदार प्रकाश स्त्रोतातून इतकी ऊर्जा बाहेर पडतेय की, ती उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. शिवाय, या प्रकाशाचे पृथ्वीपासूनचे अंतरही खूप आहे. काही शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रकाश स्त्रोत काही गरम वायूंचा मोठा गोळा आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण वैज्ञानिकांना हा प्रकाश स्त्रोत नेमका काय आहे, याबाबत स्पष्टता आलेली नाही.
सूर्यापेक्षा 57 हजार कोटी पट अधिक तेजस्वी प्रकाश
पृथ्वीपासून सुमारे 380 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर अंतराळात शास्त्रज्ञांना सूर्यापेक्षा 57 हजार कोटी पट अधिक तेजस्वी प्रकाश स्त्रोत सापडला आहे. हा सुपरनोव्हाहूनही 20 पटीने अधिक चमकदार आहे. एखाद्या ताऱ्याचं आयुष्य संपत, तेव्हा त्याचा मोठा स्फोट होतो. यावेळी अंतराळामध्ये मोठी ऊर्जा आणि प्रकाश उत्सर्जित होतो, यालाच सुपरनोव्हा असं म्हणतात. शास्त्रज्ञांनी शोधलेला नवा प्रकाश स्त्रोत अशा 20 सुपरनोव्हाहून जास्त लख्ख आणि तेजस्वी आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रकाश स्त्रोत एक सुपरनोव्हा
काही शास्त्रज्ञांच्या मते, हा प्रकाश स्त्रोत एक सुपरनोव्हा (Supernova) आहे. सुपरनोवाला मॅग्नेटार (Magnetar) असंही म्हणतात. वैज्ञानिकांच्या मते, आतापर्यंत शोधलेल्या सर्व मॅग्नेटॉरपैकी हा सर्वात चमकदार आणि सर्वाधिक ऊर्जा देणारा मॅग्नेटॉर आहे. ओहायो स्टेट विश्वविद्यालयातील ॲस्ट्रोनॉमीचे प्राध्यापक क्रिजिस्तॉफ स्तानेक यांनी सांगितले की, जर हा सापडलेला प्रकाश स्त्रोत मॅग्नेटॉर असेल तर, याची ऊर्जा 1 ते 10 च्या स्केलहून जास्त म्हणजे, 11 वर आहे.
आतापर्यंत सापडलेला सर्वात शक्तिशाली मॅग्नेटॉर
शास्त्रज्ञांच्या मते, हा मॅग्नेटार आतापर्यंत सापडलेला सर्वात शक्तिशाली मॅग्नेटॉर आहे. आतापर्यंत या प्रकारचा कोणताही सुपरनोव्हा सापडलेला नाही. शास्त्रज्ञांनी या मॅग्नेटारला ASASSN-15Ih असे नाव दिले आहे. हा सामान्य सुपरनोव्हापेक्षा 200 पट अधिक प्रकाशमान आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जरी आपण आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांची चमक एकत्रित केली हा सुपरनोव्हा 20 पट अधिक प्रकाशमान आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
NASA : शास्त्रज्ञांनी शोधली दुसरी 'पृथ्वी', आकारही समान; इथेही मानवाचं वास्तव्य?