Anjali Sharma Wins Case Against Australian Government: ग्लोबल वॉर्मिंगमुळे कोणत्या समस्या होऊ शकतात? विशेषत: लहान मुलांना काय समस्या असतील? ग्लोबल वॉर्मिंग हे लहान मुलांच्या मृत्यूचे कारण ठरू शकते का? असे प्रश्न आपल्या मनामध्ये जरी येत नसतील तरी लखनौमध्ये जन्मलेल्या आणि वयाच्या 10 महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये राहिलेल्या 17 वर्षाच्या अंजली शर्माला हे प्रश्न पडत आहेत. अंजलीने तिच्या सारख्या अनेक ऑस्ट्रेलियन मुलांसाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकार विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर फेडरल कोर्टने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार हवामान बदलमुळे येणाऱ्या समस्यांपासून लहान मुलांना वाचवणे आणि त्यांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
अंजली शर्मा तिच्या आई- वडिलांसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहते. ती सध्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अंजली पर्यावरण विषयी खूप संवेदनशील आहे. अंजलीसोबत पर्यावरण संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तिच्या सारखेच सात लहान मुलं जोडली गेली आहे. अंजलीने तिच्या सात सहकाऱ्यांसोबत मे महिन्यामध्ये ऑस्ट्रेलिया सरकार विरोधात कायदेशीर लढाई सुरू केली होती. अंजली आणि तिच्या सहकाऱ्याचे असे मतं होते की, वातावरणामध्ये कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनमुळे ग्लोबल वार्मिंग वाढते. यामुळे जंगलांमध्ये आग लागेल तसेच चक्रिवादळ देखील येऊ शकते.
कोर्टाच्या या निर्णयामुळे अंजीली आणि तिचे सहकारी आनंदीत
पर्यावरण संबंधित नुकसानदायी परिवर्तनांमुळे अनेक लहान मुलांना अनेक नुकसान होऊ शकते. त्याच्या जीवाला देखील यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. अंजली आणि तिच्या सहकाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर फेडरल कोर्टने लहान मुलांच्या सुरक्षेती सर्व जबाबदारी सरकारे घ्यावी असे सांगितले. अंजलीने कोर्टाच्या या निर्णयाबद्दल सांगितले की हा निर्णय ऐतिहासिक असून तो लहान मुलांसाठी फायद्याचा आहे. त्यांनी हवामानामध्ये होणाऱ्या बदलाच्या हानीपासून लहान मुलांना वाचवणे हे ऑस्ट्रेलिया सरकारचे हे कर्तव्य आहे.
दोन लसींच्या 'मिक्स बुस्टर डोस'ला अमेरिकेत मान्यता; मिक्स डोस अधिक सुरक्षित असल्याचा दावा