लीबियाचं विमान हायजॅक, विमानात 118 प्रवासी
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2016 05:03 PM (IST)
वॅलेटा (माल्टा): लीबियाच्या एका प्रवासी विमानाचं अपहरण करण्यात आलं आहे. दोन अपहरणकर्त्यांनी आफ्रिकिया एअरलाईन्सचं 118 प्रवासी असलेलं विमान अपहरण केलं. धक्कादायक म्हणजे 118 प्रवासी असलेलं हे विमान उडवण्याची धमकी अपहरणकर्त्यांनी दिली आहे. माल्टा या देशात हे विमान उतरवण्यात आलं आहे. हे विमान लीबियाच्या साभा शहरातून त्रिपोलीला जात होतं. मात्र त्रिपोलीला जाणारं हे विमान डायव्हर्ट करुन माल्टाला उतरवलं. माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. माल्टा विमानतळ अधिकाऱ्यांनी आपत्कालीन पथकं तयार केली आहेत. दरम्यान, अपहरकर्त्यांकडे हँडग्रेनेड असल्याचं सांगण्यात येत आहे. हँडग्रेनेडची भीती दाखवून विमान हायजॅक करण्यात आलं.