मुंबई : पाकिस्तानने जगाला दाखवण्यासाठी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीसोबत भेट तर घडवून आणली, पण ती फक्त नावालाच होती. कुलभूषण जाधव आणि आई-पत्नी यांच्यात एक काचेची भिंत होती. त्यांच्यात फोनवरुन संभाषण झालं. पण या भेटीचा एक समोर आला असून त्यावरुन अनेक शंका-कुशंकाना पाठबळ दिलं आहे.


भेटीदरम्यान कुलभूषण जाधव निळ्या रंगाच्या कोट परिधान केला होता. पण या भेटीचा फोटो निरखून पाहिल्यास, जाधव यांच्या उजव्या कानावर गडद रंगाचं निशाण दिसत आहे. त्यांच्या डोकं आणि गळ्यावरही काही निशाण आहेत. ज्यावरुन हे जखमांचे निशाण असल्याचा संशय बळावला आहे.

काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही सवाल
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीही या फोटनंतर प्रश्न उपस्थित केले आहे. जाधव यांच्या डोक्यावर काही जखमांसारखे निशाण आहेत, असं शशी थरुर म्हणाले. जाधव यांच्या डोक्यावर छळाचे निशाण असू शकतात, अशी शंकाही थरुर यांनी वर्तवली.

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच!

शहजाद पुनावाला यांची शंका
कुलभूषण जाधव यांच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखमांसारखे काही निशाण दिसत आहेत, अशी शंका काँग्रेसचे माजी नेते आणि कार्यकर्ते शहजाद पुनावाला यांनीही व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचं कृत्य अमानवीय असल्याचं सांगत पुनावाला म्हणाले की, ज्याप्रकारे ही भेट झाली, त्याचा अर्थ काय? पाकिस्तानकडून जाधव यांचा छळ सुरु असल्याची शंकाही पुनावाला यांनी व्यक्त केली.


नक्की कुलभूषण जाधवच होते ना? : मैत्रिणीचा सवाल
तर दुसरीकडे कुलभूषण जाधव यांची मैत्रिण वंदना पवार म्हणाल्या की, कुलभूषण यांच्या आईला त्यांचा एक व्हिडीओ दाखवला. काचेच्या दुसरीकडे जाधव होते की नाही हे पण माहित नाही. जे फोटोमध्ये दिसतंय त्यावरुन जाधव यांचा चेहरा सुजलेला आहे. कुलभूषण जाधव 47 वर्षांचे आहेत पण फोटोमध्ये ते 70 वर्षांचे वृद्ध वाटत आहे. पाकिस्तान जाधव यांचा फारच छळ करत असल्याचं वाटत आहे, असं वंदना पवार म्हणाल्या.

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स

21 महिन्यानंतर जाधव कुटुंबियांना भेटले!
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव 25 डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटले. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव यांना काचेची एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. तिघांच्या मध्ये असलेल्या काचेच्या भिंतीमधून पाकिस्तानचा अमानवीय चेहरा समोर आला.

जाधवांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती
दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण  आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या याचिकेनंतर या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे.

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतातून त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.

कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.

‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

कुलभूषण जाधव आई-पत्नीला भेटणार!