प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी देशात आठवडाभरासाठी लग्न आणि अंत्ययात्रांवर बंदी घातली आहे. किम जोंग यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बंदी लादण्यात आली आहे.


 
36 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तारुढ पक्षाने बैठक बोलवली आहे. 33 वर्षांचे किम जोंग आपलं नेतृत्व बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील. उत्तर कोरियाला अण्वस्त्र सज्ज देश म्हणून घोषित केलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

 
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उ. कोरियाचे कडक सुरक्षाव्यवस्था राखण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी लग्न समारंभ आणि अंत्ययात्रांवर बंदी घालण्यात आली आहे.