External Affairs Minister S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वाहनाला खलिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये घेराव घातला. त्यापैकी एकाने त्यांच्या गाडीसमोर येऊन तिरंगा ध्वज फाडला. परराष्ट्रमंत्री सध्या लंडनमध्ये आहेत. येथील चॅथम हाऊस थिंक टँक येथे एका विशेष कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम आटोपल्यावर ते त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाले असताना निदर्शने करणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी त्यांना पाहताच घोषणाबाजी सुरू केली. यानंतर तिरंगा झेंडा घेऊन आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गाडीसमोर उभे राहून रस्ता अडवला. यावेळी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज फाडण्यासारखे लज्जास्पद कृत्यही केले.

निषेधाने भारतीय संतप्त

खलिस्तान समर्थकाची ही कृती सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी पकडून गाडीपासून दूर नेले. दुसरीकडे काही लोक हातात खलिस्तानचा झेंडा घेऊन घोषणा देत होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने भारतीय समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर लंडनमध्ये भारतीयांनी निदर्शने केली आहेत. भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे नागरिकांकडून होत आहे. तसेच, भारत सरकारनेही हा मुद्दा राजनयिक स्तरावर मांडणे अपेक्षित आहे.

यापूर्वीही घटना घडल्या आहेत

परदेशातील खलिस्तान समर्थक यापूर्वीही भारतविरोधी कारवाया करत आहेत. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये भारतीय दूतावासाबाहेर अशा घटना घडल्या आहेत, ज्यावर भारत सरकारने यापूर्वीच निषेध व्यक्त केला आहे.

 पीओके मिळताच काश्मीरचा प्रश्न सोडवला जाईल

जयशंकर 4 मार्चला ब्रिटनला पोहोचले. दुसऱ्या दिवशी लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीर प्रश्नाबाबत ते म्हणाले की, पीओके मिळताच हा प्रश्न संपेल. जयशंकर म्हणाले की, आम्ही काश्मीरच्या बहुतांश समस्यांवर तोडगा काढला आहे. कलम 370  हटवणे ही पहिली पायरी होती. मग दुसरी पायरी म्हणजे काश्मीरमधील विकास, आर्थिक उपक्रम आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे. निवडणुका घेणे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले, ही तिसरी पायरी होती. जयशंकर पुढे म्हणाले, “मला वाटते की आपण काश्मीरचा तो भाग परत येण्याची वाट पाहत आहोत, जो पाकिस्तानने गुप्तपणे स्वतःसाठी ठेवला आहे. जेव्हा हे पूर्ण होईल, तेव्हा मी तुम्हाला आश्वासन देतो की काश्मीर प्रश्न सोडवला जाईल.

काश्मीरची समस्या तीन टप्प्यांत सोडवली जाऊ शकते

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, आम्ही काश्मीरच्या बहुतांश प्रश्नांवर तोडगा काढला आहे. कलम 370 हटवणे ही पहिली पायरी होती. मग दुसरी पायरी म्हणजे काश्मीरमधील विकास, आर्थिक उपक्रम आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे. निवडणुका घेणे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले, ही तिसरी पायरी होती. जयशंकर पुढे म्हणाले, “मला वाटते की आपण काश्मीरचा तो भाग परत येण्याची वाट पाहत आहोत, जो पाकिस्तानने गुप्तपणे स्वतःसाठी ठेवला आहे. जेव्हा हे पूर्ण होईल, तेव्हा मी तुम्हाला आश्वासन देतो की काश्मीर प्रश्न सोडवला जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या