न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध योसेमिते राष्ट्रीय उद्यानात आठशे फूट उंचावरुन कोसळून एका दाम्पत्याला प्राण गमवावे लागले होते. सेल्फी घेण्याच्या नाद दोघांच्या जीवावर बेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. दोघे जण अमेरिकेत स्थायिक झालेले केरळचे रहिवासी होते.


29 वर्षीय विष्णू विश्वनाथ आणि 30 वर्षीय मीनाक्षी मूर्ती यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

योसेमिते व्हॅली, धबधबा यांचा नजारा दिसत असलेल्या टॅफ्ट पॉईंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ त्यांचे मृतदेह गेल्या आठवड्यात आढळले होते. त्यानंतर दोन दिवसांनी दोघांची ओळख पटली. सेल्फी घेताना पाय घसरुन दोघे जण आठशे फूट दरीत कोसळल्याचा दावा विश्वनाथच्या भावाने केला आहे.

विश्वनाथ आणि मीनाक्षी 2014 मध्ये दोघं विवाहबद्ध झाले होते. विश्वनाथ 'सिस्को' कंपनीत रुजू झाल्यामुळे दोघं नुकतेच न्यूयॉर्कहून सॅन होजेला स्थायिक झाले होते.

विश्वनाथ-मीनाक्षी 'हॉलिडेज् अँड हॅपिलीएव्हरआफ्टर्स' हा ब्लॉग लिहित होते. जगभ्रमंती करताना आलेल्या साहसी अनुभवांचं कथन त्यांनी या ब्लॉगवर केलं होतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विश्वनाथने इन्स्टाग्रामवर ग्रँड कॅन्यनचा एक फोटो पोस्ट केला होता. तिथे कॅप्शनमध्ये फोटोग्राफर्सनी भलतं साहस न करण्याचा सल्लाही त्याने दिला होता.