मुंबई : अमेरिका, युरोप खंडात साजऱ्या होणाऱ्या हॅलोविन सणाचं लोण हळूहळू भारतातही पसरायला लागलं आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कर्मचारी हॅलोविन साजरा करतात. मात्र हा सण नेमका काय आहे, त्याचा उगम कुठून झाला, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रमच आहे.
दरवर्षी 31 ऑक्टोबरला हॅलोविन हा सण साजरा केला जातो. आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये 19 व्या शतकात या प्रथेचा उगम झाला. या दिवशी पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि शेतीच्या कामात मदत करतो, अशी आस्था आहे.
ख्रिस्ती बांधव भुतांचा पोशाख करुन, प्राण्यांचे मुखवटे वापरुन नाचत आनंदोत्सव करतात. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जरी हा सण साजरा केला जात असला, तरी चित्रविचित्र कपडे घालून घाबरवणारा मेकअप यावेळी केला जातो. मात्र गैरख्रिस्ती धर्मीयांनीही आता हा सण साजरा करायला सुरुवात केली आहे.
भोपळ्यावर डोळे, नाक, तोंड कोरुन आत मेणबत्ती ठेवली जाते. हे भोपळे घर आणि आसपासच्या परिसरात लावले जातात. या भोपळ्यांना जॅक-ओ-लॅटर्न्स म्हटलं जातं. या दिवशी लहान मुलांना चॉकलेट आणि गोड पदार्थ दिले जातात.
Happy Halloween 2018 : हॅलोविन म्हणजे नेमकं काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2018 08:56 PM (IST)
आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये 19 व्या शतकात या प्रथेचा उगम झाला. या दिवशी पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि शेतीच्या कामात मदत करतो, अशी आस्था आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -