सेक्स स्कँडलमध्ये भारतीय वंशाचा ब्रिटीश खासदार, पैसे देऊन पुरुषांशी संबंध ठेवल्याचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 10:39 AM (IST)
लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहे. त्यांच्यावर पैसे देऊन पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कीथ वाझच्या या सेक्स स्कँडलचा खुलासा 'संडे मिरर' या वृत्तपत्राने केला आहे. 1987 पासून लीसीस्टरमधून लेबर पार्टीचे खासदार असलेल्या किथ वाझ यांनी मागच्याच महिन्यात एका सेक्स वर्करला आपल्या राहत्या घरी बोलावलं होतं, तसंच संबंध ठेवण्यासाठी पैसेही दिले होते असं संडे मिररने लिहिलं आहे. वाझ यांना दोन मुलंही आहेत. हाऊस ऑफ कॉमन्सच्या गृह खात्याचं गेल्या 10 वर्षांपासून असलेलं अध्यक्षपद सोडल्याचं स्पष्ट केलं आहे. वाझ अध्यक्ष असलेलं गृह खातं ब्रिटनमधील वेश्याव्यवसायाबद्दल तपासणी करत आहे. नुकताच एक अहवाल जाहीर करुन सेक्स वर्करकडून दिल्या जाणाऱ्या सेवांना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढण्याबद्दल भूमिका घेतली होती. वाझ यांनी दोन पुरुष सेक्स वर्करना पैसे दिले होते आणि प्रतिबंधित औषधासाठी पैसेही मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. 27 ऑगस्टला एका सेक्स वर्करला दोन वेळा घरी बोलावून त्याच्यासोबत 90 मिनिटे सोबत घालवली. या वृत्तपत्राने त्यांच्यातील संभाषणातील काही भागही प्रकाशित केला आहे.