नवी दिल्ली: अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामीद करझई हे 59 व्या वर्षी पिता बनले आहेत. करझई यांच्या पत्नी जीनत करझई यांनी मुलीला दिल्लीतील रुग्णालयात जन्म दिला. करझई दाम्पत्याचं हे चौथं अपत्य आहे.   करझई आणि जीनत यांच्या लग्नाच्या आठ वर्षानंतर त्यांना 2007 मध्ये पहिला मुलगा झाला होता. त्यानंतर 5 वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. मग 2014 मध्येही त्यांनी आणखी एका मुलीला जन्म दिला. आता 2016 मध्ये जन्मलेली ही त्यांची तिसरी मुलगी आणि एकूण चौथं अपत्य आहे.   मुलगा - मुलगी असा फरक करत नाही. मुलगी म्हणजे अल्लाने दिलेली भेट आहे, अशी जीनत करझई यांनी म्हटलं आहे.