Elon Musk : जेपी मॉर्गन चेस अ‍ॅन्ड कंपनीनं एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीवर 162.2 मिलियन डॉलरचा खटला दाखल केलाय. यामध्ये टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीवर शेअरच्या किंमती वाढल्यानंतर 2014 मध्ये दोन्ही कंपनीमध्ये झालेल्या स्टॉक वॉरंटचा भंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. जेपी मॉर्गन चेस अ‍ॅण्ड कंपनीनं सोमवारी मॅनहट्टन न्यायालयात टेस्ला कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, 2014 मध्ये टेस्ला कंपनीनं जेपी मॉर्गन कंपनीला वॉरंट विकले होते. जे जून आणि जुलै 2021 मध्ये वॉरंटची मुदत संपल्यानंतर टेस्ला कंपनीच्या शेअरची किंमत शेअर्सच्या मूल्यांपेक्षा कमी असल्यास ते भरपाई करतील. 2018 मध्ये मस्क यांनी केलेल्य ट्वीटमुळे टेस्ला वॉरंटची पुन्हा एकदा किंमत चुकवावी लागल्याचं मॅनहट्टन कोर्टात बँकेनं सांगितलंय. 


जेपी मॉर्गन यांनी म्हटलं आहे की, त्यांच्याकडे स्ट्राईक मूल्य समायोजित करण्याचा अधिकार होता. मस्क यांच्या 7 ऑगस्ट 2018 च्या ट्वीटनंतर त्यांचं स्ट्राइक मूल्य खूप कमी केलं होतं. टेस्लाचे शेअर्स 420 प्रति डॉलर्सला विकत घेतले जाऊ शकत होते यामुळं फंडिंग सुरक्षित होतं असंही म्हटलं जायचं. पण वॉरंटची मर्यादा संपण्यापर्यंत टेस्लाच्या शेअरची किंमत दहा पटीने वाढली होती. 


म्हणून टेस्लाचे विकले शेअर-
टेस्लाचे शेअर्स विकावे का? याबाबत एलन मस्क यांनी ट्विटरवर जगभरातील चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना विचारलं होतं. नेटकऱ्यांनी शेअर्स विकावेत, या बाजूने मतदान केले. त्यानंतर मस्क यांनी आपले शेअर्स विकले. एलन मस्क यांनी आतापर्यंत 6.9 अब्ज डॉलर किंमतीचे इलेक्ट्रिक कारचे शेअर्स विकले आहेत.    


मस्क यांच्या संपत्तीमध्ये वाढ -
एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. 300 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे मस्क जगातील पहिले व्यक्ती ठरले होते. 2021 मध्ये मस्क यांच्या संपत्तीध्ये मोठी वाढ झाली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबधित बातम्या :


Elon Musk : टेस्ला कार बिटकॉईनने खरेदी करता येणार, इलॉन मस्क यांची घोषणा
Elon Musk यांच्या संपत्तीत 24 अब्ज डॉलर्सची विक्रमी वाढ, जाणून घ्या यामागील कारण...