Joe Biden Falls Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Jo Biden) एका कार्यक्रमात मंचावरच कोसळले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन हवाई दलाच्या (US Air Force) एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान जो बायडन पाय घसरून अचानक स्टेजवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन हवाई दलातील नवीन भरती झालेल्या जवानांना पदवी बहाल केली.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन खाली कोसळले


अमेरिकन हवाई दलातील नवीन भरती झालेल्या जवानांना पदवी प्रदान केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. बायडेन मंचावरच पाय अडखळून पडले. याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जवानाला पदवी बहाल केल्यानंतर त्यांनी बाजूला जाण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं, त्यानंतर दुसरं पाऊल टाकताच बायडन अडखळून स्टेजवर खाली कोसळले. जो बायडन यांना अमेरिकेच्या हवाई दलाच्या अधिकार्‍यांनी तात्काळ मदत करून उठवलं आणि सांभाळून त्यांच्यापर्यंत नेले. 


कॅडेटशी हस्तांदोलन केल्यानंतर कोसळले बायडन


यूएस एअर फोर्स अकादमीमध्ये भाषण दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका कॅडेटशी हस्तांदोलन केलं. यानंतर दुसरं पाऊल टाकल्यानंतर ते लगेचच अडखळले आणि खाली पडले. बायडन खाली पडल्यानंतर लगेच, त्यांनी एका वस्तूकडे बोट दाखवलं. या वस्तूमुळे बायजन अडखळून खाली कोसळले होते. स्टेजवर एक छोटी काळ्या रंगाची वाळूची पिशवी ठेवण्यात आली होती. या पिशवीला अडखळल्यावर जो बायडन खाली कोसळल्याचं म्हटलं जात आहे..


याआधीही जो बायडन यांचा पाय मोडला होता


व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लाबोल्ट यांनी बायडन यांच्यासोबत घडलेल्या या दुर्घटनेनंतर लगेचच ट्वीट करत त्यांच्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की जो बायडन ठीक आहेत. जो बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बायडन पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. जो बायडन नुकतेच जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेत (G7 Summit) अडखळले होते. मात्र, त्यावेळी ते पडता-पडता बचावले. दरम्यान, 2020 साली बायडन यांच्या पाळीव कुत्र्यासोबत खेळताना बायडन पडले होते, तेव्हा त्यांचा पाय मोडला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पंतप्रधान मोदींना BOSS म्हणणं, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भाषणाचा भाग नव्हताच... एस. जयशंकर यांनी सांगितला किस्सा