मुंबई:  बुरहान वानीवरून देशद्रोहातील आरोपी आणि जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खलिदने पुन्हा गरळ ओकली आहे. उमरने बुरहानच्या कृत्याचे समर्थन करून त्याच्या कृत्याची तुलना कम्यूनिस्ट क्रांतिकारक चे गव्हेराशी केली आहे.

 

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता अध्यक्ष कन्हैया कुमारचा साथिदार उमर खलिद देशद्रोहाच्या आरोपांमध्ये जामीनावर बाहेर आहे. दरम्यान, त्याच्याशी एबीपीच्या टीमने संपर्क केला, तर त्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

 

फेसबुकच्या मध्यमातून खलिदने ओकली गरळ, बुरहानची तुलना चे गव्हेराशी

 

उमर खलिदने आपल्या फेसबुक पेजवर बुरहान वानीला शहिद ठरवले आहे. तो म्हणतो की,  ''चे गव्हेराने म्हणले होते की, जर मी मेलो, तरी मला फरक पडणार नाही, कारण त्यावेळी माझी बंदूक उचलून कोणीतरी लढत असेल. हे शब्द बुरहान वानीलाही लागू होतात. बुरहान मृत्यूला घाबरत नव्हता. त्याला सर्वसामान्यांसारखे जगणे पसंत नव्हते. त्याने याचा विरोध केला. तो स्वच्छंदीपणे जगला आणि मृत्यूलाही हसत हसत कवटाळले. काश्मीरवरील वर्चस्व संपू दे. हे भारता, तू अशा कोणत्या लोकांना हरवशील ज्यांनी भीतीलाच मागे टाकले आहे. असेच शक्तिशाली रहा बुरहान. काश्मीरच्या लोकांसाठी सहानुभूती.#FreeKashmir''

 

मार्क्सवादी क्रांतिकारक चे गव्हेरांची क्युबाच्या क्रांतीमध्ये मुख्य भूमिका

उमरने ज्या चे गव्हेराचा उल्लेख केला आहे. तो अर्जेंटिनामधील मार्क्सवादी क्रांतिकारक होता. क्युबाच्या क्रांतीमध्ये त्याचा सहभाग मुख्य भूमिका होती. चे गव्हेराच्या मृत्यूनंतर ओळख जगभरात डाव्या विचारसरणीचा प्रतिनिधी म्हणून झाली.

 

1959 साली चे गव्हेरा फिदेल क्वास्रो सरकारमधील मंत्री म्हणून भारत भेटीवरही आले होते. क्युबामध्ये परतल्यानंतर त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरूंचे मुक्तकंठाने कौतुकही केले होते