Japan Plane Accident : जपानमध्ये लँडिंग (Japan Plane Accident) करताना एका प्रवासी विमानाला आग लागली. टोकियो विमानतळावर (Tokyo Airport) ही धक्कादायक घटना घडली. हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जपानी वृत्तसंस्था NHK ने अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. एनएचकेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, विमान लँडिंगनंतर दुसऱ्या विमानाला धडकल्याने आग लागल्याचा संशय आहे.


अनेक परदेशी माध्यमांनी या घटनेचे फुटेज प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये विमानाची खिडकी स्पष्ट असून तिच्या खालून ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. जपानी मीडियानुसार आग लागलेल्या फ्लाइटचा नंबर JAL 516 होता आणि या फ्लाइटने होक्काइडो येथून उड्डाण केले होते. जपान एअरलाइन्स फ्लाइट 516 जपानी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 वाजता न्यू चिटोस विमानतळावरून निघाली आणि सायंकाळी 5.40 वाजता हानेडा येथे उतरणार होते. 










विमानाला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आग लागलेल्या विमानात 367 प्रवासी असल्याची माहिती आहे. या अपघातात जखमी अथवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही.






धडक झाल्याने विमानाला आग?


एनएचके या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या तटरक्षक विमानाची या विमानाला धडक बसली असल्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे जपानच्या तटरक्षक दलाने आपले विमान आणि अपघातग्रस्त विमानाची धडक झाली का, याचा तपास करत आहे.