सेऊल : गेल्या दीड वर्षापासून लाचखोरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सॅमसंग कंपनीचा मालक आणि अब्जाधीश ली जे यॉंग यांची अखेर दक्षिण कोरियाच्या न्याय मंत्रालयाने पॅरोलवर सुटका केली. लाचखोरी, टॅक्स चोरी आणि इतर आर्थिक गुन्ह्याखाली दक्षिण कोरियाच्या न्यायालयाने त्यांना अडीच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या फोर्ब्जच्या मते, ली जे यॉंग हे जगातले 202 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची सध्याची संपत्ती ही 11.4 अब्ज डॉलर्स इतकी आहे. दक्षिण कोरियाच्या न्याय मंत्रालयाने सोमवारी ली जे यॉंग यांना पॅरोलवर सोडत असल्याची घोषणा केली होती.
सॅमसंग या नावाजलेल्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे 52 वर्षीय मालक असलेल्या ली जे यॉंग यांना दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्रपती पार्क गियून यांच्या एका सहकाऱ्याला लाच दिल्याच्या प्रकरणात अटक केली होती. पण ली जे यॉंग यांनी आपल्यावरील हे आरोप नाकारले होते. हा आरोप सिद्ध झाल्यानंतर ली जे यॉंग यांना न्यायालयाने एकूण अडीच वर्षांच्या तुंरुगवासाची शिक्षा सुनावली होती.
सॅमसंगच्या नेतृत्वामध्ये निर्माण झालेल्या या पोकळीमुळे दक्षिण कोरियाच्या उद्योगविश्वावर परिणाम होत असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ली जे यॉंग यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी अशी मागणी त्या देशातील राजकारण्यांनी आणि उद्योगपतींनी केली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा होणारा परिणाम लक्षात घेता दक्षिण कोरियाच्या न्याय मंत्रालयाने ली जे यॉंग यांची जवळपास 800 दिवस आधीच सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण कोरियाच्या न्याय मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार ज्या कैद्यांनी त्यांच्या एकूण शिक्षेपैकी 70 टक्क्याहून कमी शिक्षा भोगली आहे त्यांना पॅरोलवर सोडण्याचं प्रमाण केवळ 0.3 टक्के इतकं आहे.
महत्वाच्या बातम्या :