न्यूयॉर्क : अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या 30 लाख स्थलांतरित नागरिकांना अमेरिकेबाहेर काढणार असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

अमेरिकेत अवैधरित्या स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून त्यांना अमेरिकेबाहेर काढण्याचा किंवा तुरुंगात धाडण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. अमेरिकेत अशाप्रकारे राहणाऱ्यांची संख्या 20 ते 30 लाखांच्या घरात असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

अमेरिकेत स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी सीमा बंदिस्त करणार असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अगदी अटीतटीची लढाई झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना 276 तर हिलरी क्लिंटन 218 इलेक्ट्रोलर वोट्स मिळाले. 270 ही मॅजिक फिगर होती.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं काम करु, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सिक्सर लगावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हिंदूंचे प्रशंसक असल्याचं सांगत निवडून आल्यास मोदींसारखी धोरणं अमेरिकेत लागू करु, अशी घोषणा केली होती.

संबंधित बातम्या


जेव्हा ओबामा - ट्रम्प यांची भेट झाली...


डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींकडून विजयाच्या शुभेच्छा


डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष !


डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द


हिलरी क्लिंटन यांची कारकीर्द


स्पेशल रिपोर्ट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होईल?


डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ


आधी मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी


निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं