नवी दिल्ली : अलिबाबा आणि आंट समुहाचे सहसंस्थापक जॅक मा (Jack Ma) हे बेपत्ता असणाऱ्या बऱ्याच चर्चा मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळाल्या. जॅक मा हे अनेक महिने कुठंच न दिसल्यामुळं त्यांच्या बेपत्ता होण्याच्या चर्चांना उधाण आलं. जागतिक स्तरावर या बाबतीत अनेकांनीच चिंताही व्यक्त केली. अखेर या असंख्य चर्चांनंतर ते या जगासमोर आले आहेत.


बुधवारी एका ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये ते शिक्षकांना संबोधित करताना दिसले. ग्रामीण स्तरावरील उपलब्ध शैक्षणिक सुविधांवर आधारित का वार्षित उपक्रमाचा भाग असणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये ते दिसून आहे. एका स्थानिक ब्लॉगच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर आली, ज्यानंतर याबाबतची खातरजमा करण्यात आली.


गुजरातमध्ये यापुढं ड्रॅगन फ्रूटचं नवं नाव 'कमलम'


चीनच्या सरकारकडून जॅक मा यांच्या कंपन्यांचा शोध सुरु


जॅक मा यांच्या जगासमोर येण्यामुळं आता भविष्याबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित झालेल्या अलिबाबा आणि आंट समुहाला यापासून मिदत मिळणार आहे. चीनकडून आंट समुहाचे 35 बिलियन डॉलरचे आयपीओ रोखल्यानंतर आणि अलिबाबाचीही चौकशी सुरु झाल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच जॅक मा हे सार्वजनिकपणे कुठंही दिसले नव्हते.





चीनमधील हुकूमशाहीवर उभा राहिलेला प्रश्न


कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या हुकुमशाहीवर पुन्हा एकदा जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांनी चीनची बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांसंदर्भात बोलताना ऑक्टोबरमध्ये शांघाईत दिलेल्या भाषणात टीका केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. तेव्हापासून जॅक मा यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात येत होता. तसेच जॅक मा यांनी स्थापन केलेला अलिबाबा समूहावर कारवाई करण्यात आली होती.